*कोविड 19 ची लस किंवा Vaccine आलेले आहे ते असुरक्षित आहे.
**वस्तुस्थिती अशी आहे की इतर कुठलेही औषध ह्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन (अन्न व औषधी प्रशासन) विभागाने जितक्या कडक परीक्षणांमधून तपासून घेतलेली असतात तितक्याच कडक परीक्षण आणि तपासण्यां मधूनही ही लस गेली असल्या कारणाने त्याची संपूर्णपणे सुरक्षितता, गुणवत्ता व परिणामकारकता तपासून घेतलेली आहे. या सगळ्या तपासणी प्रक्रिये मध्ये कुठेही गैरमार्गाचा अवलंब किंवा शॉर्टकट्स वापरलेले नाहीत. त्यामुळे ही संपूर्णतः सुरक्षित व परिणामकारक आहे .आता दुसरी कुठलीही लस घेतल्यानंतर थोडेफार ते शरीरात लक्षणं जाणवतात उदाहरणार्थ थोडासा ताप येणे किंवा अंगदुखी असे काही व्यक्तींमध्ये दिसतात .याचा अर्थ तुमच्या शरीराची प्रतिकारक्षमता (सिस्टीम) जागृत होऊन या लसीला तिने प्रतिसाद दिलेला आहे असा होतो आणि ते सकारात्मक आहे. साधारणपणे 24 ते 48 तासांमध्ये हे सर्व अंग दुखी व लक्षण ही गेले पाहिजेत.
*गैरसमज - याचे परीक्षण सर्व प्रकारच्या व देशांच्या लोकांवरती किंवा वंशाच्या वरती केले गेलेले नाहीत.
**वस्तुस्थिती अशी आहे की या चाचण्या करताना त्यामध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या लोकांमध्ये विविध देशाचे, विविध वंशाचे व विविध सामाजिक स्तराचे तसेच विविध वयोगटातील लोक होते. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम करणारेही विविध लोक होते आणि या सर्वांवरती परीक्षणाचे समान व सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत.
*गैरसमज -ही लस तयार करण्याची प्रक्रिया गडबडीत करण्यात आलेली असून याला मान्यता देण्यात ही खूपच तत्परता दाखवली गेली.
**वस्तुस्थिती अशी आहे की ही लस तयार करताना इतर लस तयार करण्याच्या प्रक्रियेमधील सगळ्या पायऱ्या किंवा फेजेस व्यवस्थितपणे राबविल्या गेलेल्या आहेत .कुठलीही पायरी मधूनच सोडून दिली गेलेली नाही.फक्त अतिशय असामान्य परिस्थिती निर्माण झाल्याने जागतिक स्तरावरील विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला वेळ कमी असल्यामुळे यात ज्या सिक्वेन्स मध्ये तीन-चार फेजमध्ये एकानंतर एक अशा ज्या केल्या जातात त्या एका नंतर एक करण्याऐवजी काही प्रमाणात ओवरलॕप्पिंग केल्या गेल्यामुळे किंवा काही फेजेस या समांतर पद्धतीने चालवण्यात आल्यामुळे याला थोडा कमी वेळ लागलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जशीजशी माहिती गोळा होत गेली तसतसे त्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले जे रुटींग प्रोसेस मध्ये सगळ्यात शेवटच्या फेज मध्ये एकत्र केल्या जाते आणि त्यासाठी जास्त वेळ लागतो .त्यामुळे ही लस तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये बराच वेळ वाचविला गेला.
*गैरसमज -ही लस शाकाहारी लोकांवर परिणामकारक नाही किंवा जे मांसाहारी नाही त्यांच्यावर ती परिणामकारक नाही.
**वस्तुस्थिती अशी आहे की या लसीमध्ये कुठल्याही प्राण्याचा कुठलाही भाग किंवा अंडी वापरण्यात आलेली नसल्यामुळे शाकाहारी व्यक्तींकरताही ही लस तेवढीच परिणामकारक आहे जितकी मांसाहारी व्यक्तींसाठी आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे लोक ही लस व्यवस्थितपणे घेऊ शकतील, त्यात कुठलाही धोका नाही.
*गैरसमज -मला covid-19 किंवा कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे तरीही मी लस घेणे आवश्यक नाही कारण माझ्या शरीरात तर अगोदरच प्रतिकारक्षमता निर्माण झाली असेलच.
**वस्तुस्थिती अशी आहे की कोविड 19 किंवा कोरोना चे इन्फेक्शन झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये antibodies काही प्रमाणात तयार झाल्या असण्याची शक्यता आहे .पण त्याचं प्रमाण किती आहे आणि पुन्हा संसर्ग (इन्फेक्शन) होऊ नये इतपत ती प्रतिकार क्षमता उत्पन्न झाली आहे की नाही याबद्दल कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळे असा सल्ला देण्यात येतो की इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर साधारणपणे चार आठवड्यानंतर तुम्ही ही लस आरामात घेऊ शकता आणि covid-19 चा संसर्ग झाला असेल आणि लस घेतली तर त्याची परिणामकारकता जास्त दिसून आलेली आहे असं शास्त्रज्ञ मंडळी सांगतात.फक्त covid-19 झाल्यानंतर त्याचे जर काही शरीरावर दुष्परिणाम दिसत असतील उदाहरणार्थ Lung Fibrosis...तर त्या लोकांनी ही लस घ्यावी की नाही यावर संशोधक मंडळींचा खल चालू असल्यामुळे तो सल्ला सद्यस्थितीत देता येऊ शकणार नाही.परीक्षण चालू आहेत.
*गैरसमज - या लसीकरणामुळेच मला covid-19 होऊ शकतो.
**वस्तुस्थिती अशी आहे की ही लस घेतल्यानंतर कुठले प्रकारचा covid 19 किंवा कोरोनाचा संसर्ग ( इन्फेक्शन )होत नाही आणि जर ईतर कारणांनी(मास्क न वापरणे,गर्दीत मिसळणे,योग्य अंतर न राखता लोकांशी संपर्कात राहणे,हात साबणाने न धुणे,सॕनिटायझर न वापरणे ई.) संसर्ग (इन्फेक्शन) झाला तर त्याचे गंभीर दुष्परिणाम (सिरीयस इफेक्ट) आपल्या शरीरावर ती दिसत नाहीत.
*वदंता- गर्भवती मातांना ही लस देता येत नाही.
**वस्तुस्थिती -सध्याच्या परिस्थिती मध्ये कुठल्याही गर्भवती मातेवर या लसीचे परीक्षण किंवा चाचण्या झाल्या नसल्यामुळे गर्भवती मातांनी सध्यातरी ही लस घेणे योग्य नाही अशा निष्कर्षाप्रत शास्त्रज्ञ आलेले आहेत.यावर पुढील संशोधनाअंती निष्कर्ष सांगू शकता येईल.
*गैरसमज - स्तनदा मातांनी हे लसीकरण करु नये.
**वस्तुस्थिती अशी आहे की दुग्धपान करणाऱ्या बाळा वरती याचा काही परिणाम होईल का याही बाबतीत पूर्णपणे परीक्षण झाले नसल्यामुळे ठोस प्रमाणात असं काही सांगता येऊ शकत नाही .परंतु जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने) स्तनदा माता नी ही लस घेतली तर बाळावरती काही परिणाम होत नाही असे सांगितलं आहे आणि स्तनदा मातांनी लस घ्यावी अशी शिफारस केलेली आहे.
माहिती स्त्रोत - एन एच एस , यु के. आणि जागतिक आरोग्य संघटना.
संकलन :-
डाॅ विजेंद् इंगळे ,
कान नाक घसा तज्ञ , राॅयल फि् हाॅस्पीटल , लंडन
( संस्थापक - माय मराठी युके )
मराठी अनुवाद :-
डाॅ अजय माने
(स्त्री आरोग्य तज्ञ व औद्योगिक आरोग्य तज्ञ,जिजाई हॉस्पिटल व यशवंत हॉस्पिटल, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत.)
Fact :- The expected high standards of safety, quality & efficacy for the Covid 19 vaccine remain the same as for any medicine or vaccine. The vaccine has been through a rigorous approval process. There were no shortcuts taken with regulating these vaccines. You may get mild side effects which are to be expected after any vaccine, and these are just a sign that the vaccine is working and your immune system is being primed to protect you against COVID-19. The side effects should disappear completely between 24 to 48 hours after getting the vaccine.
*Myth: The vaccine trials didn’t include participants from different communities/countries?
Fact: The trials included a diverse range of participants.
People from all walks of life & ethnicity have been part of the Covid 19 Vaccine trials including health care professionals. Vaccine effectiveness was the same in all participants .
*Myth: The vaccines were developed and approved too quickly?
Fact: The COVID-19 vaccines have been through all the necessary development and approval stages. All steps in the usual vaccine development process have been rigorously followed for the Covid 19 Vaccine.
· The different phases of the clinical trial were delivered to overlap instead of running sequentially which sped up the clinical process.
· There was a rolling assessment of data was done as soon as they were available and were scrutinised.
*Myth: The vaccine isn’t suitable for vegans, or people who don’t eat meat for religious reasons??
Fact: The COVID-19 vaccine does not contain any animal products or egg. This means that it is suitable for vegans, and for anybody who chooses not to eat meat.
*Myth: I’ve already had COVID-19, so I don’t need to be vaccinated?
Fact: It’s advised that everyone gets the vaccine, as we don’t yet know whether having COVID-19 in the past will prevent you from catching it again or how long any immunity that you do have from COVID-19 infection will last. Those who have had COVID-19 should wait four weeks before being vaccinated. Those who have mild residual symptoms (often referred to as ‘long Covid’) should still get the jab. However, where people are suffering significant ongoing complications from COVID-19 they should discuss whether or not to have a vaccine now with a clinician
*Myth: The vaccine could give me COVID-19 ?
Fact: The vaccine cannot give you COVID-19 directly . However, getting vaccinated will reduce your chance of becoming seriously ill in the future even if you get covid.
*Myth: The COVID-19 vaccine affects fertility?
Fact: There is no evidence to suggest that COVID-19 vaccines affect fertility.
*Covid Vaccine in pregnancy – yes/ no ?
The Covid 19 vaccine have not been tested in pregnancy , so until more information is available Pregnant ladies should not routinely have this vaccine.
*Breast Feeding :-
No data available at present however Covid 19 vaccines are not thought to be a risk to the breast feeding infant .
WHO has recommended that the vaccine can be received whilst breast feeding .
Source- NHS UK , WHO
Shared by Dr Vijendra Ingle (ENT Surgeon ,London)